देवपूरपाडे हे गाव नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात वसलेले आहे. गाव नाशिक शहरापासून साधारणतः ८८
काही किलोमीटर अंतरावर असून रस्तेमार्गे सहज पोहोचता येते.
गावाची लोकसंख्या प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. सोयाबीन, भात, गहू, ज्वारी, कांदा, द्राक्षे ही येथील प्रमुख
पिके असून भाजीपाला उत्पादनही महत्त्वाचे आहे. गावातील बहुतांश कुटुंबे दुग्ध व्यवसाय आणि शेतीपूरक
व्यवसाय करतात.
देवपूरपाडे हे गाव नैसर्गिक सौंदर्याने नटलेले असून सभोवताल हिरवाईने वेढलेले आहे. गावात मंदिरे, सांस्कृतिक
स्थळे तसेच पारंपरिक लोककला जपली जाते. ग्रामस्थ विविध सामाजिक आणि धार्मिक सण उत्साहाने साजरे
करता.
गावात प्राथमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र अशा मूलभूत सोयी उपलब्ध आहेत. तसेच ग्रामपंचायतीमार्फत
विकासकामे, स्वच्छता उपक्रम आणि शासकीय योजना नियमितपणे राबवल्या जातात.
देवपूरपाडे गाव देवळा तालुक्यातील एक प्रगतिशील व एकात्मता जोपासणारे गाव मानले जाते. येथे शेती,
शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक ऐक्यामुळे गावकऱ्यांचा जीवनमान उंचावत आहे.
देवपूरपाडे गावात सप्तशृंगी माता मंदिर असल्याने येथे नवरात्री काळात खूप गर्दी असते. गावात दररोज
दर्शनासाठी खूप गर्दी असते चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी देवीची यात्रा भरते.
सदर गाव हे गिरणा नदीच्या जवळ बसलेले होते.सदर गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर हि याच नदीपात्राच्या
किनाऱ्यावर आहे सदर गाव हे गट नंबर १२ मध्ये बसलेले असून सदर गावची लोकसंख्या आज रोजी २२३६
इतकी आहे.
देवपूरपाडे गावापासून साधारण २ किमी अंतरावर रणदेवपाडे हि लोकवस्ती आहे रानेश्वर महाराज मंदिरामुळे
या वस्तीला रणदेवपाडे असे नाव देण्यात आले असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतची स्थापना दिनांक २०/०१/२०२० रोजी झाली.
श्री. किरणकुमावर रंगनाथ चौरे
सौ. मनिषा अंबादास कुवर
श्री. बाळू गोविंदा सावंत
| कर्मचारी याचे नाव Name of Employee |
पद Post |
संपर्क क्रमांक Contact Number |
|---|---|---|
| श्री.किरणकुमार रंगनाथ चौरे | ग्रामपंचायत अधिकारी Grampanchayat Officer |
9637228474 |
| श्री.सोमेश भिला शेवाळे | संगणक परिचालक Computer Operator |
9579426006 |
| श्री.विष्णू जगन्नाथ बंदरे | ग्रामपंचायत क्लार्क / शिपाई Grampanchayat Clerk / Peon |
9665654550 |
| श्री.दादाजी जगन्नाथ माळी | ग्रामरोजगार सेवक Village Employment Servant |
9096266822 |
XMEGA